पुणे शहर

खडकवासला धरण १००टक्के भरले ; मुठा नदीत विसर्ग वाढविल्याने नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे काठोकाठ भरली आहे. त्यामुळे पुणेकर आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने धरणातून विसर्ग सुरु केलाय. त्यामुळे मुठा नदीचं पात्र दुधडी भरुन वाहू लागलंय. त्यामुळे नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील धरणं काठोकाठ भरल्याने आता पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंताही मिटली आहे. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याचा धोका टळला आहे. पाऊस आणखी काही दिवस सुरु राहणार असल्याने शेती आणि इतर कामांसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल.

Img 20210913 wa0011 1

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु केल्याने मुठा नदीचं पात्र दुधडी भरुन वाहू लागलंय. शहराच्या मध्यवर्ती भागातील भिडे पुलाला पाणी लागलंय. नदीपात्रावरील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीपात्रात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये