सरकारचा मंत्री मंडळ विस्तार, या आमदारांनी घेतली शपथ..पुण्याला दोन मंत्री

चंद्रकांत पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ..
महाराष्ट्र सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार आज नागपूर येथे पार पडला. या नवीन मंत्री मंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. पुण्याला आणखी एक मंत्री पद मिळाले असून आमदार माधुरी मिसाळ यांची ही मंत्री मंडळात वर्णी लागली असून त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
या मंत्री मंडळात भाजपच्या सर्वाधिक 19 शिवसेना शिंदे गटाच्या 11 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.

या मंत्र्यांनी घेतली शपथ
भाजप
चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ – राज्यमंत्री, पंकज भोयर – राज्यमंत्री, मेघना बोर्डीकर – राज्यमंत्री, शिवेंद्रसिंहराजे भोसले
शिवसेना
गुलाबराव पाटील, दादा भुसे,संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई,संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, आशीष जैस्वाल – राज्यमंत्री, योगेश कदम – राज्यमंत्री
राष्ट्रवादी
हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, मकरंद जाधव, बाबासाहेब पाटील, इद्रनील नाईक



चंद्रकांत पाटील यांचा परिचय
जन्म १० जून १९५९; प्रभूदास चाळ, रे रोड, मुंबई,
आई-वडील दोघेही मिल कामगार,
राजा शिवाजी विद्यालय, दादर, मुंबई येथे शालेय शिक्षण
सिद्धार्थ महाविद्यालय, फोर्ट, मुंबई येथे बी. कॉम. पदवी शिक्षण.
पत्नी सौ. अंजली चंद्रकांत पाटील, बी. कॉम., आयसीडब्ल्यूए (कॉस्ट ऑडिटर)
एकनाथजी शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री पदाची जबाबदारी
ऑगस्ट २०२२ ते ऑक्टोबर २०२३ पुणे जिल्हा पालकमंत्री; ४ ऑक्टोबर २०२३ पासून सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून घेतलेले महत्वपूर्ण निर्णय
१) मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय.
२) नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी.
वस्त्रोद्योग मंत्री म्हणून घेतलेले महत्वपूर्ण निर्णय
राज्यात वस्त्रोद्योग धोरण लागू करण्यासाठी योगदान.
राज्याचे कॅबिनेट मंत्री
२०१४ ते २०१९ महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, मदत आणि पुनर्वसन, कृषी व फलोत्पादन या खात्यांची जबाबदारी. मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी.
विधिमंडळ कार्य
जुलै २०१६ ते ऑक्टोबर २०१९ विधान परिषद सभागृह नेता म्हणून जबाबदारी. २००८ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य म्हणून निवड, २०१४ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड. २०१९ आणि २०२४ साली कोथरूड, पुणे विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवड. ऑगस्ट २०२२ पासून संसदीय कार्य मंत्री म्हणून कार्य.
भारतीय जनता पार्टी, प्रदेशाध्यक्ष दि. १६ जुलै २०१९ ते १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत
प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा शिवसेना युतीने विधानसभा निवडणुकीत १६१ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळविले. प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात प्रभावी कार्य
सामाजिक बांधलकी
कोथरूड मध्ये समुत्कर्ष सोशल फाउंडेशन, मानसी उपक्रम यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला बळ. ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छाया, आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील नववधूंना झाल, सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल मुलींचे पालकत्व, मोफत ई सेवा केंद्र, कोवीड काळातील सेवा कार्य, दिवाळी फराळ, एकांकिका स्पर्धा, गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून कोथरुड मधील प्रत्येक घटकाशी संपर्क स्थापन करण्यात यश.
माधुरी मिसाळ यांचा परिचय
माधुरी मिसाळ या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. मिसाळ या 2009 पासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्या सलग 4 वेळा पर्वती मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या कामांमुळे भाजप पक्षाने त्यांना यावेळी मंत्रिपदाची संधी दिली आहे.






