महाराष्ट्र

शनिशिंगणापुरातील चौथऱ्यावरील दर्शन सशुल्क

अहमदनगर : शनिशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी आता पाचशे रुपये देणगी मूल्य आकारले जाणार आहे. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 18 जून 2022 पासून सुरू करण्यात आली आहे.

Img 20220521 wa0000

या चौथऱ्यावर पूर्वी महिलांना प्रवेश बंदी होती. या विरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर हा चौथरा महिलांसाठी खुला करण्यात आला.  मात्र, काही काळातच सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांनाच चौथऱ्यावर प्रवेश बंद करण्यात आला. त्यानंतर कोरोनाकाळात मंदिर बंद होते. ते सुरू झाल्यानंतर चौथरा खुला करण्याची मागणी होत होती. त्यामुळे देवस्थानने तो खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. आता चौथऱ्यावरील दर्शनासाठी शुल्क लागणार आहे. देवस्थानने घेतलेल्या निर्णयावर भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Img 20220610 wa0330

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये