पुणे शहर

नायलॉन मांजा विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई; एकाला अटक

पुणे : बंदी घालण्यात आलेल्या नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. लोहियानगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सोहेल आरीफ शेख (रा. इनामकेमळा, लोहीयानगर) याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहियानगरमध्ये एकजण नायलाॅन मांजाची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलीस नाईक अमोल पवार यांना मिळाली. शेख याचे गोळ्या बिस्किटे विक्रीचे दुकान आहे. शेख नायलाॅन मांजाची विक्री करत असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव, रमेश तापकीर, अमोल पवार, शशिकांत दरेकर आदींनी ही कारवाई केली.

Img 20221126 wa02126927299965323449855
महाराष्ट्र केसरी : सिकंदर शेखची जोरदार सुरुवात पाहा व्हिडिओ

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये