औंध, बाणेर परिसरातील अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न सोडवल्याने चंद्रकांत पाटील यांना नागरिकांची साथ…

पुणे : कोथरूड मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या कामाची तडफ प्रत्येक कोथरूडकराला माहीत झाली आहे. आमदार म्हणून कोथरूड मतदार संघात काम करत असताना चंद्रकांत पाटील यांनी अनेक वर्षांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्याच कारणाने चंद्रकांत पाटील यांनी प्रचारादरम्यान मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांनी केलेली विकास कामे ठळकपणे सर्वांच्या लक्षात आहेत. त्यात प्रामुख्याने, पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये औंध हद्दीतील सर्व्हे नंबर 158 आणि 159 मध्ये 18 मीटर डीपी रस्त्याचे प्रयोजन करण्यात आले होते. बाणेर गावाचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर हा रस्ता सरकवण्याचा प्रयत्न झाला होता. हा रस्ता झाला तर औंध, बाणेर मधील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार होती.
तथापि, या प्रस्तावाला तीस वर्षे होऊन देखील अंमलबजावणी होत नव्हती. शेवटी चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात हा प्रश्न आला, त्यांनी जातीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवला, आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका केली. हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे तब्बल 30 वर्षानंतर पुणे महानगरपालिकेने बाणेर हद्दीमध्ये दिलेल्या झोनिंग दाखल्यामुळे औंध, बाणेर हद्दीतील सर्व्हे नंबर 158 लगत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नागरस रस्ता हा साठ फुटी डीपी रस्ता करण्याचा मार्ग मोकळा झाला. हे प्रलंबित प्रश्न सोडवल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. या केलेल्या कामांमुळे नागरिक चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील असे चित्र दिसत आहे.





