आम्ही सारे भारतीय असा संदेश देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कोथरूड मध्ये शोकसभेचे आयोजन

पुणे: काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी मनाला सुन्न करणारा दहशतवादी हल्ला झाला असून यामध्ये निष्पाप २७ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा निषेध व्यक्त करत “आम्ही सारे भारतीय” असा संदेश देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कोथरूड मध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
कोथरूड येथील हुतात्मा राजगुरू चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या निंदनीय घटनेचा कोथरूड मतदार संघातील करिष्मा सोसायटी जवळ असणाऱ्या हुतात्मा राजगुरू चौकामध्ये निषेध करण्यात आला. याप्रसंगी जात, धर्म, पंथ, भाषा असे सर्व भेदाभेद विसरून आपण भारतीय म्हणून एकत्र येत दहशतवादाचा सामना केला पाहिजे, असे प्रतिपादन केले. यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शोकसभेचे आयोजन कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दादा दुधाने युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी आणि कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी केले.










