शिवचरित्र विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी : शिवव्याख्याते सी ए. प्रसाद मोरे

शिवजयंती नाचून नाही वाचून..मोरया मित्र मंडळाचा उपक्रम ; शाळांना शिवचरित्र पुस्तके भेट
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज जंयती नाचुन नाही वाचुन हा उपक्रम मोरया मित्र मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी राबवण्यात येतो. यंदा ही छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील शिवचरित्र पुस्तके विविध शाळांमध्ये भेट देऊन महाराजांचे विचार व पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम मंडळाकडून करण्यात आले.

यावेळी शिवव्याख्याते सी ए प्रसाद मोरे यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले. शिवचरित्र विद्यार्थ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहणार असून विद्यार्थ्यांनी शिवचरित्र वाचले पाहिजे. शिवचारित्राचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी ते आत्मसात केले पाहिजे आणि शिवाजी महाराजांना आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवला पहिजे असे ते म्हणाले.



मोरया मित्र मंडळाच्या वतीने कर्वेनगर भागातील, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, आणि वारजे पुल ते डेक्कन भागामधील ४० शाळांमध्ये जाऊन छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील शिवचरित्र पुस्तके भेट देण्यात आली.
ह्या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक केदार वसंत मारणे यांनी केले होते. यावेळी ते म्हणाले मोरया मित्र मंडळ सतत सामाजिक उपक्रम राबवत असते. गेल्या काही वर्षापासून शिवाजी महाराज जयंती नाचून नाही वाचुन साजरी करावी हि संकल्पना पुढे आली आणि मंडळाने ती उत्स्फूर्त राबवली. शिवाजी म्हणजे
शि म्हनजे शिका
वा म्हनजे वाचा
जी म्हनजे जिंका
म्हणून शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिवाजी महाराज कळावे म्हणून आम्ही ही पुस्तके त्याच्या पर्यंत पोहचवत आहोत. आम्हाला शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या विचारांची पिढी निर्माण करायची आहे. विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावेत म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहे. शिवचरित्र हे प्रेरणादायी आहे. भविष्यात विद्यार्थी शिवचरित्राचं वाचणं केल्यानंतर जग जिंकल्या शिवाय राहणार नाही असे वाटते.
ही पुस्तके भारतीय इतिहास संशोधक मंडळ सभासद मंगेश नवघणे, व्याख्याते प्रसाद जी मोरे, मयुर बनकर, राहुल विभुते यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी सिनेअभिनेत्री पायल गणपत जाधव, डी.सी.पी संभाजी कदम, मंडळाचे अध्यक्ष अथर्व भरम, अमृत मारणे, रोहिदास जाधव, संदिप शितोळे, प्रमोद वारशेट्टी, अनिल कडू, गणेश शिंदे ,विजय औजी, ब्रम्हानंद टाक , कैलास सरतापे आणि मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.






