कोथरुडमहाराष्ट्र

मास्क न वापरणाऱ्या आमदाराला कोथरुड मध्ये दंड

कोथरुड : सध्या मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून दंडात्मक कारवाई शहरात सर्वत्र सुरूआहे. आज कोथरूड मध्ये अशीच कारवाई चालू असताना प्रशासनाकडून काँग्रेसचे नांदेडचे आमदार अमरनाथ राजूरकर यांना देखील मास्क न वापरल्याबद्दल दंड करण्यात आला. त्यांच्याकडून पोलीस व महानगरपालिकेच्या प्रशासनाने पाचशे रुपयांचे शुल्क वसूल केले. ही कारवाई करत असताना शाब्दिक वाद ही घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय व पोलीस प्रशासनाच्या वतीने कोथरुड मध्ये जोरात मास्क न वापरणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई सुरू आहे.  सदर कारवाईचे आदेश विभागीय आयुक्तामार्फत  देण्यात आले आहेत.  कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक १०,११,१२  मध्ये कारवाई सुरू आहे. मास्क न वापरणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडून ५००/- रुपये व थुंकी सम्राटांकडून १०००/- रुपये प्रमाणे कारवाई करण्यात आली. आतापर्यंत मास्क न वापरणारे २८० व सार्वजनिक ठिकाणी थुंकून कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या ६ अशा एकूण  २८६ नागरिकांवर कारवाई करून  १,४६,०००/- रूपये शुल्क केवळ तीन दिवसात वसूल करण्यात आले.

कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम, पोलीस निरिक्षक  प्रतिभा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक मा. राम सोनवणे,  पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे, भैरवनाथ शेळके यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, गणेश साठे, प्रमोद चव्हाण, वैभव घटकांबळे, शिवाजी गायकवाड, रूपाली शेंडगे, पोलीस हवालदार ए. आर. अंधारे, विलास जोशी, एस. एस. लोखंडे, मनोज पवार, श्रावण शेवाळे, गणेश कंधारे, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे,  लक्ष्मण सोनवणे,साईनाथ तेलंगी, अशोक कांबळे, विजय पाटील  या भरारी पथकाने कारवाई केली. .

Img 20200910 wa0182

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये