कोथरुड

कोथरूडमध्ये शासन आपल्या दारी उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आयोजन..

कोथरूड :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष,  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या  ‘शासन आपल्या दारी’ या लोकोपयोगी उपक्रमास कोथरूडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Img 20250715 wa04753390034906410967929

या उपक्रमाचे आयोजन गोकुळ सभागृह, सुतारदरा,कोथरूड येथे करण्यात आले होते. माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमाअंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ कोथरूड भागातील सुतारदरा,जयभवानी नगर, किष्किंधानगर, शिवतीर्थनगर, म्हातोबा नगर तसेच सोसायटी परिसरातील सुमारे ७०० पेक्षा जास्त नागरिकांना करून देण्यात आला.

Img 20250508 wa0001235733770892078245

त्यामध्ये आधारकार्ड दुरुस्ती करणे, रेशनकार्ड दुरुस्ती करणे, ज्येष्ठ नागरिक कार्ड, शहरी गरीब कार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर दाखला ही शासकीय कागदपत्रे तसेच राज्य सरकारच्या तरुण,तरुणी, महिलांसाठीच्या विविध योजना यांची माहिती देऊन पूर्तता करण्यात आली. सदर लोकाभिमुख उपक्रमाचे संयोजन कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष  हर्षवर्धन मानकर, तृप्ती शिंदे, कांता खिलारे यांनी अतिशय नियोजनबद्ध केले होते.

विविध प्रकारचे शासकीय दाखले मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घेतला. सकाळपासूनच नागरिकांनी गोकुळ सभागृहात गर्दी केली होती. उत्तम नियोजनामुळे दाखले काढून घेतना व इतर शासकीय कामांसाठीची कागदपत्रे तयार करताना नागरिकांची गैरसोय झाली नाही, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये