पुणे शहर
बिबट्याच्या हल्ल्यात महाविद्यालयीन तरुणी ठार

पुणे : महाविद्यालयीन तरुणी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील जांबुत (ता. शिरूर) येथे घडली आहे. ही घटना सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जोरी मळ्यातील 19 वर्षीय पुजा भगवान नरवडे ही युवती सायंकाळी आपल्या घराबाहेर भांडी घासत असताना उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. ही युवती कला शाखेच्या पहिल्या वर्गात शिकत होती. या घटनेमुळे बेट भागातील नागरिक संतप्त झाले असून नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. यापूर्वीही या भागात अशा घटना घडलेल्या आहेत.






