पुणे शहर

पुणे शहरातील रोडच्या मिसिंग लिंक आम्ही मोफत शोधून देऊ आयुक्त साहेब तुम्ही बदली करून घ्या- उज्वल केसकर

पुणे : विक्रम कुमार यांनी आपली बदली आपण करून घ्यावी ही विनंती आपण शैक्षणिक दृष्ट्या वास्तु विशारद म्हणजे आर्किटेक्ट आहात. पुणे शहरातील रोडच्या मिसिंग लिंक आम्ही मोफत शोधून देऊ आयुक्त साहेब तुम्ही बदली करून घ्या.असे म्हणत भाजप नेते उज्वल केसकर यांनी महापालिका आयुक्तांना योग्य पद्धतीने कामे होत नसतील तर बदली करून घ्या. असा सल्ला दिला आहे.

केसकर म्हणाले, पुणे महानगरपालिकेने 2013 स*** प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात जवळपास 797 किलोमीटरच्या डीपी रस्त्यांची नोंदच घेतली नाही. ही वस्तुस्थिती आम्ही विहित मुदतीत हरकती सूचनेद्वारे नोंदवली होती.
तीआपली चूक लपवण्यासाठी प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही.

Img 20220610 wa0330

याबाबत सर्व कागदपत्र आपल्या पालिका कार्यालयात उपलब्ध आहेत.काहीतरी केले हे दाखवायचे आणि व्यावसायिकांचा फायदा करून द्यायचा हे जे नव्हे नवतंत्र महानगरपालिकेने अवलंबले आहे त्याचा हा भाग आहे असे आम्हाला वाटते. त्याचे अधिकारी शहर अभियंता, विकास योजनेतील अधिकारी हे सक्षम असून हे सर्व आठ दिवसाच्या आत मिसिंग लींक तुम्ही ज्या म्हणता त्या शोधू शकतात.

दिवाळीनंतर आम्ही हे काम तुम्हाला मोफत करून देऊ.
कुठल्याही सल्लागाराची कुणाच्याही सांगण्यावरून नेमणूक करू नका.अन्यथा मे हायकोर्टात जावे लागले.साहेब तुम्ही बदली करून घ्यावी. ही विनंती,संस्थेच्या हिताचे काम न करता,बदली होऊ नये म्हणून फक्त 2 व्यक्ती साठी काम करीत आहत असे अधिकारी सांगतात.असे निवेदन उज्ज्वल केसकर,सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी पुणे महापालिका आयुक्तांना दिले आहे.

Img 20220924 182515 453

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये