पुणे शहर

पुणे महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांसमवेत महापौरांची कोरोना आढावा बैठक हा झाला निर्णय…

पुणे : शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व  पक्षनेते, पदाधिकारी व महापालिका अधिकारी व आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये कोरोना आढावा बैठक महापौर निवासस्थान येथे पार पडली. कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना, कोरोना रुग्णांकरता मोठ्या प्रमाणावर बेड्स चे व्यवस्थापन, ऑक्सिजन ची शहरातील स्थिती, रेमडेसिवीर इंजेक्शन चा तुटवडा, व्यापक लसीकरण मोहीम तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासकीय समन्वय या बाबतीत सर्वांनी आपापली मते मांडून सविस्तर चर्चा करण्यात आली.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, नाशिक येथे झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने तशा प्रकारची अनुचित घटना पुणे शहरात होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या दृष्टीने व्यापक चर्चा झाली असून, शहरातील सर्वच रुग्णालये जिथे ऑक्सिजन यंत्रणा उपलब्ध असेल त्या ठिकाणचे फायर ऑडिट प्रमाणेच ऑडिट करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. त्या पद्धतीच्या सूचना देखील संबंधित रुग्णालय प्रशासनास करण्यात आल्या आहेत.

Img 20210421 wa0018

राज्य शासनाच्या अन्न व औषध विभागाच्या माध्यमातून पुणे शहरातील रेमडेसिवीरची तूट भरून काढण्यासाठी योग्य त्या उपाययोजना व मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे.

याप्रसंगी उपमहापौर सुनिताताई वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेस गटनेते आबा बागुल व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये