पुणे शहर

छत्रपती शिवाजी महाराज जयंती नाचुन नाही पुस्तके वाचुन ; मोरया मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम..

पुणे : मोरया मित्र मंडळ कर्वेनगर पुणे यांच्या वतीने कर्वेनगर भागांमध्ये आणि भागामधील सर्व शाळांमध्ये जाऊन राजा शिवछत्रपती, श्रीमान योगी, शिवराय: संस्कार आणि शिक्षण , शिवाजी महाराज नसते तर, मुकदर हे शिवचरित्र वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक केदार मारणे यांनी केले होते.

यावेळी ते म्हणाले मोरया मित्र मंडळ सतत सामाजिक उपक्रम राबवत असते , ह्यावर्षी शिवाजी महाराज जयंती वाचुन साजरी करावी हि संकल्पना राबवली कारण शिवाजी म्हणजे ‘ शि’ म्हणजे शिका, ‘वा’ म्हणजे वाचा, ‘ जी ‘ म्हणजे जिंका म्हणून शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिवाजी महाराज कळावे म्हणून आम्ही हि पुस्तके त्याच्या पर्यंत पोहचवत आहोत.

आम्हाला शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या विचारांची पिढी निर्माण करायची आहे. म्हणून मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहे.
या शिवचरित्रांचे वाटप पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ अध्यक्ष विजय पारगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सागर शिगवण ,गिरीश भागवत, मच्छिंद्र नर्के , अनिल आठवले,अथर्व भरम, रोहिदास जाधव,अनुया सायगावकर उपस्थित होते .

Fb img 1647413731457

पारगे म्हणाले, पुस्तक वाचले कि मस्तक घडत आणि मेंदुचा व्यायाम होतो , आपल्या ज्ञानात भर पडते , तणाव कमी होतो , आणि मेंदू सक्रीय राहतो आणि जो पुस्तक वाचतो त्याला निर्णय घ्यायला वेळ लागत नाही. शिवचरित्र हे प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी शिवचरित्र वाचणं केल्यानंतर जग जिंकल्या शिवाय राहणार नाहीत असं वाटतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये