अर्थजगत

LPG PRICE HIKE : सिलिंडर पुन्हा महागला

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीच व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही मोठी दरवाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी वाणिज्य वापरातील 19 किलोच्या सिलिंडरमध्ये 250 रुपयांची वाढ केली आहे. मुंबईत 2205 रुपयांना 19 किलो एलपीजी सिलिंडर मिळणार आहे.घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झाला नाही. 

विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. घरगुती सिलिंडरची किंमत मुंबईत 949.50 इतकी आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना महागाईचा जोरदार झटका बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये