फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर ब्लू टिक आणि व्हेरिफाइड बॅजसाठी शुल्क
पुणे : मेटाने आपली व्हेरिफाइड सेवा भारतात लाँच केली आहे. या अंतर्गत ग्राहकांना फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर ब्लू टिक आणि व्हेरिफाइड बॅजसाठी शुल्क द्यावे लागणार आहे.
युजर्सला हे सब्सक्रिप्शन आयओएस आणि अँड्रॉइडवर 699 रुपये प्रती महिना शुल्क भरून विकत घेता येणार आहे. मेटा व्हेरिफाइड सर्व्हिसेस अंतर्गत युजर्स सरकारी आयडीच्या माध्यमातून आपले अकाउंट व्हेरिफाय करु शकतात. ट्विटरही ब्लू टिकसाठी शुल्क आकारते.
भारतात, युजर्सना iOS आणि Android मोबाईलसाठी दरमहा 699 रुपये द्यावे लागतील. तर वेबवर हे फिचर वापरण्यासाठी युजर्सना दरमहा 599 रुपये खर्च करावे लागतील आणि त्यानंतरच त्यांना ब्लू टिक दिली जाईल. मात्र तुम्हाला दोन्ही प्लॅटफॉर्मवर ब्लू टिक हवी असेल तर तुम्हाला सरकारकडून मंजूर झालेले ओळखपत्र दाखवावे लागेल. त्यानंतरच त्याची पडताळणी होईल आणि तुम्हाला ब्लू टिक मिळू शकेल. सरकारी आयडी तुमच्या फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर वापरल्या जाणार्या प्रोफाइल नाव आणि फोटोशी जुळणार्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर वैध असणार आहे.
या अटी कराव्या लागणार पूर्ण
याशिवाय आणखी काही अटी युजर्सना पूर्ण कराव्या लागतील. पहिली अट म्हणजे युजरचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी वय असलेल्या ब्लू टिक मिळणार नाही. याशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्ही पोस्टिंग हिस्ट्री देखील तपासण्यात येणार आहे. त्यानंतरच ब्लू टिक देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
दरम्यान, मेटा सांगितले की, “आम्ही जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये या सर्व्हिसचे सुरुवातीच्या चाचणीचे चांगले परिणाम पाहिल्यानंतर आम्ही भारतात मेटा ब्लू टिकचा विस्तार करत आहोत. ब्लू टिक मिळवण्यासाठी पात्र होण्यासाठी, युजरचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.”