राष्ट्रीय
अरुणाचल प्रदेशमध्ये हिमस्खलनामुळे 7 जवानांचा मृत्यू

ईटानगर : अरुणाचल प्रदेशमधील केमांग भागामध्ये हिमस्खलनामुळे 7 जवानांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दोन दिवसांपूर्वी हे जवान तिथे अडकले होते.

भारतीय लष्कराकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी हे जवान केमांग सेक्टरमध्ये अडकले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, अखेर त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. गस्ती पथकाचा भाग म्हणून हे जवान या भागात गेले असता मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिमस्खलनामुळे ते केमांग सेक्टरमधल्या उंचावरच्या ठिकाणावर अडकून पडले. ही घटना घडल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली. मात्र, आज ही शोधमोहीम पूर्ण झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.



