आरोग्यपुणे शहर

पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्ण

पुणे विभागातील 1 लाख 18 हजार 779 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले.
विभागात कोरोना बाधित 1 लाख 67 हजार 79 रुग्ण
                                                       -विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे: पुणे विभागातील 1 लाख 18 हजार 779 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 67 हजार 79 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 954 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 4 हजार 346 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.09 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
  पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 25 हजार 197 रुग्णांपैकी 95 हजार 865 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 450 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 882 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.57 टक्के आहे.
सातारा जिल्हा
  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 7 हजार 371 रुग्णांपैकी 3 हजार 940 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 189 आहे. कोरोनाबाधित एकूण 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
    सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 602 रुग्णांपैकी 9 हजार 15 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 983 आहे. कोरोनाबाधित एकूण 604 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 6 हजार 320 रुग्णांपैकी 3 हजार 53 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 54 आहे. कोरोनाबाधित एकूण 213  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
  कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 14 हजार 589 रुग्णांपैकी 6 हजार 906 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 278 आहे. कोरोनाबाधित एकूण 405 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 195 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 800, सातारा जिल्ह्यात 242, सोलापूर जिल्ह्यात 407, सांगली जिल्ह्यात 315 तर कोल्हापूर जिल्ह्यात 431 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 7 हजार 749 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 67 हजार 79 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 16 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
………………………..

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये