नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडून ५ हजार कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटप

कोथरुड : प्रभाग क्रमांक १० मधील ५ हजार नागरिकांना दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडून गेल्या ६ वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत प्रभाग क्र. १० बावधन- कोथरूड व बावधन बु. मधील ५००० कुटुंबांना रवा , मैदा, पिठीसाखर, तेल, बेसनपीठ, डालडा, भाजके पोहे, मिठपुडा, हरभरा डाळ, मोतीगुलाब साबण असे सामानाचे किट देण्यात येणार असून त्याचे वाटप करण्यास सुरवात करण्यात आली आहे.

या प्रसंगी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा प्रभुणे- पाठक, स्वीकृत सदस्य वैभव मुरकुटे, बाळा टेमकर, प्रभाग १० भाजपा अध्यक्ष सागर कडू , सरचिटणीस भाजपा खडकवासला अजय मोहोळ, भाजपा कोथरुड उपाध्यक्ष रुपेश भोसले, बी.डी.पी. समिती सभासद प्रतीक वायकर, कोथरुड महिला मोर्चा उपाध्यक्ष सुप्रिया माझिरे, आदी उपस्थित होते.



नागरिकांची दिवाळी आनंदात जावी म्हणून गेली सहा वर्ष आम्ही सरंजाम वाटपाचा उपक्रम राबवत आहोत. सध्या कोवीड च्या संकटामुळे सर्वच जण अडचणीत आले आहेत. या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना नक्कीच दिलासा मिळणार असल्याचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी सांगितले.



