अभिनव विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाकडून तृतीय पंथीयांना फराळ वाटप

पुणे : आम्ही अभिनवकर या अभिनव विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाकडून एरंडवणे आणि कोथरुड येथील तृतीय पंथीयांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
या वेळी अध्यक्ष पिताम्बर पाटील यांनी फक्त दिवाळीतच नाही तर आम्ही कायम तुमच्या पाठिशी असल्याचे त्यांना सांगितले, तसेच त्यातील काही जण शाळेचे माजी विद्यार्थी आहेत असेही सांगितले.

चांदनी या तृतीय पंथी भगिनीने यांनी तुम्ही आम्हाला दिवाळी फराळ दिला व सन्मान दिला या बद्दल समाधान व्यक्त केले. आणि न्यायालयाने तर आम्हाला समान वागणूक द्यावी असा निकाल दिला आहे पण समाज अजून स्विकारत नाही, परंतु या उपक्रमामुळे समाजाचा दृष्टिकोन बदलेल अशी आशा व्यक्त केली.
सेकेटरी कुलदीप सावळेकर यांनी नोकरी आणि व्यवसायिक मदतही करू असे आश्वासन दिले, सह कार्यवाह प्रशांत बनकर यांनी आभार मानले.या वेळी स्विकृत नगरसेविका अँड् सौ मीताली सावळेकर, अँड् सौ प्राची बगाटे, निलेश गरूडकर, बाळासाहेब धनवे, समीर ताडे, नामदेव पवळ हे उपस्थित होते.















