आरोग्यराष्ट्रीय

थोडा धीर धरा पण आत्महत्या नको- डॉ. सचिन नागापूरकर

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन

इ.स.२००३ साला पासून जागतिक आरोग्य संघटनेने १० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या विरोधी दिन साजरा करते. खरंच कोणी आपला जीव धोक्यात घालून का संपवतो ही कल्पनाच करताना त्रास होतो. मानसिक धक्का बसतो. जो जन्म आपल्याला मिळाला आहे तो असाच संपवायचा….खरंच आत्महत्या का करत असतील लोकं ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय कारणे असावीत ह्याची. कधी आपण विचार केला आहे का?

आपण समाजात वावरताना कधी कोणाला मदत करून त्याने आत्महत्या करू नये ह्या बद्दल काही केले आहे का?
मानसिक ताण तणाव हेच खरे कारण आहे आत्महत्येचं.
मग तो मानसिक ताण तणाव का आला ?
काही लोकांच्या बाबतीत आर्थिक परिस्थिती बिकट होणे अथवा असणे, सामाजिक बहिष्कार टाकला गेला असेल तरी ती व्यक्ती ताणतणाव मध्ये येते व मग आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. कामधंदा नसणे अथवा कामधंदा व्यवस्थित न चालणे, घरात होणारी भांडणे, कमी शिक्षण असणे ज्यामुळे नोकरी न मिळणे व त्यामुळे आलेले नैराश्य,
प्रेम प्रकरणात आलेला दुरावा, गैरसमज, मानसिक आजार,
एकलकोंडा स्वभाव अशी बरीच कारणे आहेत.

आज महाराष्ट्रात असो अथवा देशात शेतकरी आत्महत्या खूप प्रमाणात होत आहेत.सततचा दुष्काळ, शेतीमालाला मिळात नसलेली किंमत, खानदानी गरिबी…..कर्ज….अश्या कारणांमुळे शेतकरी वर्ग आत्महत्या करत आहे. ही चिंतेची बाब आहे.

शाळा काॅलेज मध्ये जाणारे तरूण, काॅलेज मधून पदवी घेऊन बाहेर पडल्यावर नोकरी मिळाली नाही
म्हणून पण बरेच जण आत्महत्या करत आहेत.
ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
नैराश्य येणे स्वाभाविक आहे. पण त्यावर रस्ता शोधला पाहिजे, उत्तर शोधले पाहिजे. दरवेळी आपल्या मनातील गोष्टी घडतीलच असे नाही .थोडा संयंम पाळला पाहिजे.
विचार केला पाहिजे.आपल्या एका चुकीच्या निर्णयाने काय होईल.आपल्या पश्चात घरच्यांचे काय हाल होतील.

यातून बाहेर पडण्यासाठी
मित्र परिवारातील लोकांना आपले दुःख सांगा.
ते काही तरी पर्याय उपलब्ध करून देतील.
घरातील लोकांशी बोला.मनातील भीती कमी करा.
चुकले तर चुक मान्य करून परत नव्याने आयुष्य सुरू करा.पण आत्महत्या करणे हा पर्याय नको.
गरजे नुसार डाॅक्टरांचा सल्ला घ्या. मनात वाईट विचार येत असतील तर डाॅक्टर मदत करू शकतील..

योग…साधना करा.
पण आत्महत्या करू नका. इतका सुंदर जन्म परत नाही.
आनंदाने रहा. हेलेदावे करू नका. सगळे आपल्या मनातील चांगले घडेलच असे नाही. आज शेतात काही उगवले नाही म्हणून काय झाले…सर्व शेतकरी आपल्या सारखेच आहेत.त्यांच्या कडे बघा. आनंद व दुःख वाटून घ्या. एखादा जोडधंदा करता येईल का याचा विचार करा.

विद्यार्थी मित्रांनो घरच्यांनी अभ्यास करा सांगितले म्हणून राग मानू नका.आपले आई वडील आपल्या भविष्यासाठीच सगळे करत असतात. आपल्याला जर एखाद्या क्षेत्रात भविष्य घडवायचे आहे व आई वडील दुसऱ्या क्षेत्रात करियर करण्यासाठी हट्ट करत असतील तर एकदा त्यांच्या सोबत बोला..तुम्हाला काय आवडते ते सांगा..सल्लामस्लत करा.नक्कीच पर्याय उपलब्ध होईल.पण आत्महत्या नको…

कोरोना मुळे आज बरेच उद्योग बंद आहेत. बऱ्याच जणांची नोकरी गेली आहे. पण धीर सोडू नका एकमेकांना मदत करा. मानसिक आधार द्या. बोला मन हलके करा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. थोडा धीर धरा. पण आत्महत्या नको. हा जन्म परत नाही. मस्त बिनधास्त रहा आणि
आनंदाने जगा.

डाॅ.सचिन नागापूरकर
अस्थीरोग तज्ञ, पुणे

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये