पुणे शहर

कोथरूड मधील श्री साई मित्र मंडळ ट्रस्टने साकारलेली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी पुणे शहर, जिल्ह्यातून गर्दी

कोथरूड : कोथरूड मधील पौड रस्त्यावरील श्री साई मित्र मंडळ ट्रस्ट ने आपल्या भव्यदिव्य देखाव्याची परंपरा कायम राखत यंदा अयोध्येत उभ्या राहत असलेल्या श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे. हे मंदिर पाहण्यासाठी पुणे शहर व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

माजी महापौर मुरलीधर मोहोळ या मंडळाचे संस्थापक आहेत. पौड रस्त्यावरील आनंदनगर चौकात अयोध्येत उभ्या राहत असलेल्या श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या ठिकाणी गर्दी करत असून गणेशा बरोबर श्रीरामाचे दर्शन घेत गणपती बाप्पा मोरया व जय श्रीरामाचा जयघोष करत आहेत.

मंडळाकडून अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली असली तरी अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्याचे काम करण्यात आल्याचे दिसत आहे. बाहेरून पाहिल्यानंतर मंदिराचा कळसच या देखाव्याच्या भव्यदिव्यतेची प्रचिती देत आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या खांबांवर करण्यात आलेले कोरीव काम, छताला लावण्यात आलेले झुंबर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिरात आल्यानंतर सर्वप्रथम मंडळाच्या गणरायाचे दर्शन होते. तर मागे श्रीरामाचे दर्शन घेता येते. मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत असल्याने दर्शनाचे योग्य नियोजन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

मागील वर्षी खंडेरायाची कृपा झाली सोन्याची जेजुरी कोथरूडमध्ये आवतरवली होती तर यावर्षी अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिराचा अनुभव कोथरूडमध्ये भाविकांना घेता येत आहे. मागील वर्षी भंडाऱ्याची उधळण करत तळी उचलत यळकोट यळकोट जयमल्हारचा जयघोष झाला तर यंदा जयश्रीरामाचा अखंड जयघोष सुरू आहे.

Img 20230717 wa0012281291948762095496285435

मुरलीधर मोहोळ म्हणाले, आपल्या भागातील हजारो नागरिक अयोध्या आंदोलनात सक्रीय सहभागी झालेले होते. त्या प्रत्येकाच्यासाठी राम मंदिर हा आत्मियतेचा विषय आहे. आयोध्येत राम मंदिर उभे राहावे, यासाठी देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदूंनी अभूतपूर्व ऐक्याचे दर्शन घडविले.

राम मंदिर म्हणजे आपल्या जगण्याचा श्वास आहे, त्यांचे मंदिर हा आपल्यासाठी अलौकिक क्षण आहे. या सर्व भावनेचा विचार करुनच आपल्या गणेश उत्सवात राम मंदिराचा देखावा साकारण्याचा आम्ही निर्धार केला होता. हा देखावा प्रत्येक भाविकाला अयोध्येत घेऊन जाईल असा आम्हाला विश्वास आहे. मंदिराची प्रतिकृती पाहिल्यानंतर गणरायाचे व श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून मनाला समाधान मिळत असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

करण धुमाळ हे मंडळाचे अध्यक्ष आहेत तर श्रीधर मोहोळ हे उत्सव प्रमुख आहेत. निलेश कोंढाळकर कार्याध्यक्ष, दीपक पत्की उपाध्यक्ष, प्रकाश कोंढाळकर उपाध्यक्ष, योगेश शिंदे खजिनदार, सुशांत खंडेलवाल सरचिटणीस, तर तेजस कुलकर्णी हे संघटक आहेत.

Fb img 16955465114016174473417848307835
Img 20230920 wa00037367904631585549378
Fb img 16955465254713840313835475428868
Img 20230918 wa00064731255599054231743
Img 20230511 wa0002282295271751229740402775

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये