पुणे शहर

युनिक प्रोस्पेरो सोसायटीत चंद्रयान मोहिमेचा आकर्षक देखावा

पुणे : लोहगाव-धानोरी परिसरातील डी. एन. परांडे मार्ग पोरवाल रोड येथील युनिक प्रोस्पेरो सोसायटीत यंदा चंद्रयान मोहिमेचा आकर्षक देखावा सादर करण्यात आलेला आहे. ‘गो ग्रीन ‘उपक्रम राबवण्यात अग्रगण्य सोसायटी म्हणून ती ओळखली जाते. सोलर प्लँट बसवून विजेची बचत व पर्यावरण पूरक उपक्रम सोसायटीतर्फे यशस्वीपणे राबविण्यात आलेले आहेत.

Img 20230717 wa0012281291948762095496285435

गेल्या पाच वर्षांपासून एकूण ७९ कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. सोसायटीच्या गणपती उत्सवाचे हे सलग चौथे वर्ष आहे.
सर्व सोसायटी समिती सदस्य व स्थायिक नागरिक एकत्रित येऊन गणेशोत्सव साजरा करतात. सोसायटीतील सर्व आबाल-वृद्ध एकत्र येऊन गणेशोत्सवातील उपक्रमांचा आनंद घेतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तंबोला, गायन, नृत्य, रांगोळी व इतर अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सत्यनारायण व महाप्रसादाने उपक्रमाची सांगता केली जाते.

Img 20230511 wa0002282295271751229740402775

कामगारांचा सहभाग

सोसायटीतील कामगार वर्ग देखील समर्पित भावनेने गणेशोत्सवात सहभागी असतो. सोसायटीचे अध्यक्ष संतोष उत्तेकर, श्रीकांत वहिले, श्रेयश व श्रेया कांबळे, नवीन खंडेलवाल, निलेश दानी, आशुतोष श्रीवास्तव, नितीन पोवार, विनीत कुलकर्णी, शांन्मुक संचेती व इतर समिती सदस्य व सोसायटीतील रहिवासी यांनी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी बहुमोल सहकार्य केले आहे. पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती सोसायटी सातत्याने कार्यरत आहे.

Img 20230918 wa00064731255599054231743
Img 20230920 wa00037367904631585549378

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये