पुणे शहर

चंद्रकांत पाटील यांच्या बाईक रॅलीला बाणेरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद; फटाक्यांच्या आतिषबाजी आणि पुष्पवृष्टीने जागोजागी उत्साहात स्वागत

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ बाणेर-बालेवाडी भागात बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बाणेरकरांकडून या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा महायुतीने चांगलीच आघाडी घेतलेली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांच्या आणि प्रथितयश व्यक्तींच्या घरोघरी भेटी घेऊन संपर्क अभियान राबविले आहे.

Img 20241020 wa0001435697684176070576

त्यासोबतच आज भाजपा कोथरूड उत्तर मंडलच्या वतीने महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ बाणेर- बालेवाडी भागात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोझे  कॉलेज, साई चौक, ममता चौक, दसरा चौक – बालेवाडी गावठाण, बालेवाडी- ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, बालेवाडी- भीमनगर, पाण्याची टाकी, लक्ष्मीमाता मंदिर, चाकणकर मळा, बालेवाडी फाटा, माधव बाग, छत्रपत्री शिवाजी महाराज स्मारक, बाणेर गावठाण, दत्तमंदिर, बाणेर गावठाण, राघुनाना चौक मुरकुटे गार्डन, युतिका सोसायटी – चांदेरे चौपाटी, अंजोर सोसायटी आदी मार्गे ही रॅली मार्गस्थ झाली. तर माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांचे जनसंपर्क कार्यालय येथे रॅलीचा समारोप झाला.

या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि पुष्पवृष्टीने ठिकठिकाणी चंद्रकांत पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर अनेक चौकांमध्ये महिलांकडून औक्षण करुन पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पाटील यांनी बैलगाडीचेही सारथ्य करत, साऱ्यांचेच लक्ष्य वेधले.

Img 20240404 wa0016281297658999536660438617

यावेळी भाजप उत्तर उत्तर मंडलचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये