पुणे शहर

पुण्यात भरदुपारी तरुणावर प्राणघातक हल्ला; युवक ICU त, मोबाईलसह रोख रक्कम लंपास

पुणे : कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणावर चौघा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने गळ्यावर, पोटावर, दंडावर, गुडघ्यावर वार करुन जबर जखमी केली. त्याच्याकडील रोकड व मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना खडकी बाजार बसस्टॉपजवळ शनिवारी भरदुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेत विशाल दीपक काळे हा तरुण जबर जखमी झाला असून त्याच्यावर वाय सी एममधील आय सी युमध्ये उपचार करण्यात येत आहेत. याबाबत गणेश दादु पातरकर (वय १७, रा. फुलेनगर, विश्रांतवाडी) याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पातरकर व विशाल काळे हे कपडे खरेदी करण्यासाठी खडकी बाजार येथे आले होते. खडकी बाजार बसस्टॉपजवळ वडापाव खाऊन ते कपडे घेण्यासाठी जात होते. त्यावेळी दोन दुचाकीवरुन चौघे जण आले. त्यांच्यातील एकाने फिर्यादीला जवळ बोलावून तुम्ही कुठं राहता असे विचारले. त्यावर त्याने फुलेनगर, विश्रांतवाडी असे सांगितले. त्यावेळी एक जण विशाल याला तू माझ्याकडे रागाने का पाहतो, असे बोलून हाताने मारहाण करु लागला. चौघांनी दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने धारदार शस्त्र बाहेर काढल्याने ते घाबरले व दोन वेगवेगळ्या दिशेला पळाले. त्या चौघांनी विशालचा पाठलाग करुन त्याला नवीन होळकर पुलाजवळ गाठले. त्याच्याकडील दीड हजार रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. धारदार शस्त्राने विशालच्या गळ्यावर, पोटावर, पायाच्या गुडघ्यावर, दंडावर वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर ते चौघे पळून गेले. विशाल याला वायसीएम हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी आय सी यु मध्ये दाखल करुन उपचार सुरु केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगार तपास करीत आहेत.

Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये