कोथरुड

नगरसेविका अल्पना वरपे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या स्वा.वि.दा.सावरकर बालोद्यानचे आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते लोकार्पण..

कोथरुड : प्रभाग क्र. १० भुसारी कॉलनी येथील स्वा.वि.दा सावरकर मैदान येथील वापरात नसलेल्या जागेवर नगरसेविका अल्पना गणेश वरपे यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या वतीने साकारण्यात आलेल्या स्वा.वि.दा.सावरकर बालोद्यानचे   खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार  भिमराव तापकीर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, किरण दगडेपाटील, अॅड.गणेश वरपे, स्विकृत सदस्य बाळासाहेब टेमकर, गोरख दगडेपाटील, प्रभाग अध्यक्ष सागर कडू, कैलास मोहोळ, राजाभाऊ जोरी, अभिजीत राऊत, अक्षय ढाकणे, गणेश कोकाटे, मयूर कांबळे, प्रदिप जोरी, सुरेंद्र कंधारे, तसेच कांचन कुंबरे, सोनिया महाजन, सुप्रिया माझिरे, राजश्री मुरकुटे, जान्हवी जोशी, अमरजा पटवर्धन, सुहासिनी शिराढोणकर, आरती मुरकुटे आदि उपस्थित होते. 

या बालोद्यानात सदर लहान मुलांकरीता जंपिंग जॅक, खेळणी, खाऊवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला  होता. या बालोद्यानात खेळणी,कार्टुन्स यांबरोबरच समुद्राच्या बीच वरील माती देखील असल्याने बाल-गोपाळांनी मातीत खेळण्याचा मनमुरादपणे आनंद  लुटला.

Img 20220118 wa0213

यावेळी बोलताना तापकीर म्हणाले, मोकळ्या जागेवर   अतिशय उत्कृष्ट असे बालोद्यान नगरसेविका अल्पना वरपे यांच्या प्रयत्नातून साकारले गेले आहे. तसेच गेल्या पाच वर्षात अनेक वर्षापासून रखडलेली कामे म्हणजेच भुसारी काॅलनीतील ओपन प्लाॅट ताब्यात घेऊन विकसित करणे, रखडलेले डीपी रस्ते खुले करणे अशी अनेक कामे पाठपुरावा करून नगरसेवकांनी मार्गी लावली आहेत. तसेच भाजपच्या काळात या भागाच्या वाहतुकीच्या दृष्टीने  महत्वाचा असणार्‍या चांदणी चौकातील उड्डाणपूलाचे काम, मेट्रोस्टेशनचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

अल्पना वरपे यांनी भुसारी काॅलनी येथील स्वा. वि. दा सावरकर मैदान, पं.भीमसेन जोशी उद्यानातील कलादालन  उजवी भुसारी कॉलनी येथील ताब्यात घेतलेले ओपन स्पेस, डावी भुसारी कॉलनी येथील शृंगेरीमठा जवळून वारजे कडे जाणारा सर्व्हिस रोडचे सुरू असलेले काम , रखडलेले आशिष गार्डन डीपी रोडचे काम मार्गी लावणे अशा केलेल्या विकास कामाची माहिती दिली. भाजपा महिला पदाधिकारी, सवंगडी ज्येष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी व मान्यवर नागरीक यावेळी उपस्थित होते. सागर कडू यांनी सूत्रसंचालन केले व कैलास मोहोळ यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये