पुणे शहर

डान्स अकॅडमीज अडचणीत ; चालू करायला परवानगी द्यावी


पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नृत्य संस्था (डान्स अकॅडमी) व नृत्य कलाकारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नृत्य संस्थां सोशल डिस्टंसिंग व इतर नियम पळून सुरू करण्याबाबत परवानगी देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून डान्स अकॅडमी बंद आहेत. त्यामुळे अकॅडमी मधील कलाकारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. बहुतेक कलाकारांची या कलेवर उपजीविका अवलंबून आहे. सध्या हा अडचणीच्या काळात प्रत्येक विभागाचा विचार केला जातो तसाच नृत्य विभागातील कलाकारांचा विचार होणे आवश्यक आहे.  डान्स अकॅडमी सुरू व्हाव्यात यासाठी शहरातील महत्वाच्या डान्स अकॅडमीज कडून निवेदन ही देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट, साहित्य, कला, सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेश यांच्याकडून ही पत्र देण्यात आले आहे.

शासकीय नियमांचे पालन करून या डान्स अकॅडमी कशा सुरू करता येतील याबाबत तातडीने विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये