पुणे शहर

विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांची पुणे महापालिकेबाहेर निदर्शने

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सर्व खात्यामध्ये ७३८० कंत्राटी कामगार सन २००७ पासून अतिशय आल्प वेतनावर कामे करत आहेत. या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यांच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांना वेठीस न धरता काम करून बेमुदत निदर्शने करण्याचा निर्धार कामगारांनी केला असून विविध मागण्यांसाठी चार दिवसांपासून पुणे महापालिके बाहेर कामगारांची निदर्शने सुरू आहेत. या कामगारांच्या निदर्शनांना भातृ संघटनांनी सुद्धा जाहीर पाठींबा दिला आहे.

पुणे महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांचा बोनस, घरभाडे भत्ता व रजावेतन वेतनातून कमी केले आहे. हे सर्व फरकासहीत अदा करणेविषयी त्वरित निर्णय घ्यावा, तसेच भविष्यनिर्वाह निधी व ई. एस. आय. सीचा भरणा योग्य रितीने न करणार्‍या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी,
दरमहा वेतनपावती आणि १० तारखेच्या आत वेतन कामगारांना दिले जावे, कोरोना मध्ये कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी मृत्यु झालेल्या कंत्राटी कामगारांना नुकसान भरपाई मूळ मालक या नात्याने पुणे महानगरपालिकेने त्वरित द्यावी अशा मागण्या कामगारांकडून केल्या जात आहेत.

पुणे मनपा प्रशासनाने २४ फेब्रुवारी २०१५ पासून शासनाच्या जिआर प्रमाणे वेतन अदा करणे अपेक्षित होते पण ते किमान वेतन १७ फेब्रुवारी २०२१ पासून लागू केले आहे, आणि हे करत असताना बेकायदेशीर पद्धतीने बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन हे कंत्राटी कामगारांचा कायदेशीर अधिकार असताना देण्याचे बंद केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगांराना बोनस, घरभाडे व रजा वेतन दिले जाते ते फक्त पुणे महानगरपालिकेने किमान वेतन लागू करताना या वेतनातील सुविधा बंद करून टाकल्या आहेत. या अन्यायाविरोधात पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने वारंवार प्रशासनाकडे दाद मागितली, परंतु प्रशासनाने हे हक्क देण्यास नकार दिला. याबाबत पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने औद्योगिक न्यायालयात दाद मागण्यासाठी दावा दाखल करण्यात आला आहे. सदर निदर्शनामध्ये कायम कामगार तसेच बालवाडी शिक्षिका व सेविका, कायम व कंत्राटी मोटार सारथी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Img 20230717 wa0012281294517541507444836162

पुणे महापालिका आयुक्त व अन्य खातेप्रमुख यांची बैठक १८ आक्टोबर रोजी घेणार आहे. सदर बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे एक दिवसासाठी हे अंदोलन स्थगित करण्यात आले आहे. ठोस निर्णय दिल्या शिवाय आमचे अंदोलन थांबवणार नाही. कंत्राटी कामगांराचा लढा तीव्र करण्याचा इशारा कॉ. उदय भट यांनी दिला आहे.

कामगार युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर सभेला मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,” कंत्राटी कामगांराच्या मागण्या अगदी रास्त असताना तेही संविधानाने दिलेले कामगांराचे हक्क नाकारणे हे हे घटनेतील कायद्याच्या विरुद्ध आहे. कामगांराच्या हक्काची पायमल्ली कराल तर आम्ही ते सहन करणार नाही असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. कंत्राटी कामगारांनो संघटीतपणे एकजुटीत लढा व शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यासाठी सज्ज व्हा….! कामगांरानी क्रांती केल्या स्वस्थ बसू नका. कार्लमार्क्स या कामगांर नेत्यांनी “जगातील कामगांरानों एक व्हावा” असा संदेश दिला. या त्यांच्या संदेशानुसार कामगारांनी जागतिक पातळीवर संघटीत होऊन खूप मोठ्या प्रमाणात क्रांती झाली यातूनच जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात उलथापालथ होऊन रशिया मध्ये कामगार वर्गाचे राज्य आले. त्याप्रमाणे कंत्राटी कामगारांनी संघटीत व एकजुटीत राहून लढा…! असे आवाहन मुक्ता मनोहर यांनी केले आहे.”

युनियनचे कार्याध्यक्ष कॉ. मधुकर नरसिंगे, संयुक्त चिटणीस कॉ. रोहिणी जाधव, उपाध्यक्ष कॉ. शोभा बनसोडे, कॉ. दिलीप कांबळे, कॉ. सुदाम गोसावी, कॉ. राम अडागळे, कॉ. करुणा गजधनी, कॉ. ओंकार काळे, कॉ. प्रमिला वाघमारे, कॉ. सिद्धार्थ प्रभुणे, कॉ. अनंत मालप, कॉ. प्रकाश हुरकडली, कॉ. अर्चना धिमधिमे, कॉ. सविता पारधे यांनी मार्गदर्शन केले. सभेचे सुत्रसंचलन कॉ. प्रकाश चव्हाण यांनी केले समारोप कॉ. मधुकर नरसिंगे यांनी केला.

Img 20230511 wa0002282292294772633607891151

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये