पुणे शहर

मुरलीधर मोहोळ यांना मोठी संधी देण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

पुणे : मुरलीधर मोहोळ यांचा महापौरपदाचा कार्यकाळ पुर्ण झाला असला तरी लोकांच्या मनातील महापौर मुरलीधर मोहोळच आहेत. याचा अर्थ असा नाही की, मुरली अण्णा आम्ही तुम्हाला पर्मनंट महापौर ठेवणार, तूम्ही वरिष्ठ पदावर जाणार आहे. अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले आहे. या निमित्ताने मुरलीधर मोहोळ यांना मोठी संधी देण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

विनायक बेदरकर
संपादक- सिंहासन NEWS

माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने कोथरूड मधील आयडियल कॉलनीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

आगामी काळात मुरलीधर मोहोळ यांना भाजप पक्षनेतृत्वाकडून नेमकी कोणती मोठी संधी देण्यात येणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोहोळ यांना वरिष्ठ जवाबदारी देण्याचे संकेत दिल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Fb img 1648963058213

फडणवीस म्हणाले, गेल्या दोन वर्षांत कोविड च्या संकटामध्ये पुण्याचे महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी मोठे काम केले आहे. या संकट काळात लोकांना हवी असलेली मदत देण्यासाठी मोहोळ अहोरात्र झटत होते. त्यामूळे मोहोळ यांचे महापौर पदाचा कार्यकाळ पुर्ण झाला असला तरी लोकांच्या मनातील महापौर मुरलीधर मोहोळच आहेत. त्यांना महापौर पदाच्या वरिल पदाची संधी मिळेल.

Fb img 16504250884693500455106425966004
Img 20220419 wa0007968353280963622575

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये