पुणे शहर

खराडी येथे मिसळच्या हॉटेलसहित 8 दुकानांना भीषण आग

पुणे : नगर रस्त्यावर खराडी जुना जकात नाका येथे रस्त्यावर असलेल्या जोगेश्वरी मिसळ व बाजूच्या फर्निचर मोबाईल शॉपी च्या दुकानाला आग लागून आत्तापर्यंत आठ दुकाने खाक झाली आहेत.

आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. यात हॉटेल जोगेश्वरी मिसळ, दोन मोबाईल शॉप, तीन फर्निचर, हॉटेल एस कुमार यांना आग लागली आहे. आतापर्यंत चार आगीचे बंब आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.  सकाळी साडेनऊच्या दरम्यान ही आग लागली अग्निशामक दलाचे बंब उशिरा आल्याने आग आवाक्याच्या बाहेर गेली. आग लागल्याने नगर रस्त्यावर मोठी वाहतुक कोंडी झाली असुन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Fb img 16504250884693500455106425966004
Img 20220419 wa0007968353280963622575
Img 20220419 wa0026

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये