‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ने 3 दिवसांत कमावले इतके कोटी

पुणे : ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करतोय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 2.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर गेल्या तीन दिवसांत ‘धर्मवीर’ने 9.59 कोटी रुपये कमावले आहेत.
महाराष्ट्रात अजूनही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत. ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, पुणे आणि मुंबईतही विविध ठिकाणी हाऊसफुल गर्दी जमवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाला तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचं प्रमोशनही अगदी जोरदार करण्यात आलं. प्रमोशन आणि माऊथ पब्लिसिटीचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होताना दिसतोय. वीकेंडलाही ‘धर्मवीर’ची चांगली कमाई झाली. रविवारी या चित्रपटाने 3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. प्रसाद ओकने साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली.
चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये या अभिनेत्याने साकारली, तर अभिनेता क्षितिज दाते हा एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत आहे. रंगभूषाकार विद्याधर बट्टे यांनी या कलाकारांच्या लूकवर विशेष मेहनत घेतली आहे. अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकच्या करिअरमधील सुवर्णकाळ सध्या सुरू आहे, असं म्हटल्यास त्यामुळं वावगं ठरणार नाही.
प्रवीण तरडे दिग्दर्शित हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चारशेहून अधिक थिएटर्समध्ये ‘धर्मवीर’चे 10 हजारांहून अधिक शोज लावले गेले आहेत. या चित्रपटाचा पहिला पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाला तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचं प्रमोशनही अगदी जोरदार करण्यात आलं. प्रमोशन आणि माऊथ पब्लिसिटीचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होताना दिसतोय. वीकेंडलाही ‘धर्मवीर’ची चांगली कमाई झाली आहे.




