यापुढे इमर्जन्सी रुग्णांकडून डिपॉझिट घेणार नाही, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आली जाग…

पुणे : पुण्यात भाजप आमदाराचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत भिसे यांच्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांना वेळीच उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. त्यानंतर आता रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत इथून पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंट कडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे.
आम्ही इथून पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंट कडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही. रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत माहिती दिली आहे. दुर्दैवी घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाची मान शरमेने खाली गेली.
दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या नावाला काळेफा असल्यामुळे आमची मान शर्मिला खाली गेली. सगळं पाहून लता मंगेशकर यांना मानणारे लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देव जाणे, असे परिपत्रक म्हटले आहे.

कालचा दिवस दिनाच्या इतिहासातील अत्यंत काळा आणि सुन्न करणारा.आजपर्यंत केलेल्या कामाची जाणीव न ठेवता ोर्चेकर्यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकली.काही महिला कार्यकर्त्यांनी डॉक्टर घैसास यांच्या हॉस्पिटलची तोडफोड केली.
काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तर लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाला काळे फासले.
हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली.हे पाहून लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देव जाणे.या सर्व गोष्टींनी निराश होऊन विश्वस्त मंडळांची काल बैठक झाली.लोक कशा पद्धतीने चुकीचे वागत आहे किंवा या घटनेला राजकीय रंग कसा येत चालला हे सोडून आम्ही आत्मचिंतन केले.झालेल्या दुर्दैवी घटनेमागे दिनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे चुकीचे चालले.. तरीसुद्धा आम्ही रुग्णालयाकडून संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे तपासात आहोत.



सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः जमेल तेवढी रक्कम भरा असे सांगितले..मात्र तरीसुद्धा ते कोणालाही न करता निघून गेले..
दीनानाथ रुग्णालय सुरू झालं तेव्हा पुन्हा तेही रूपातील अनामक रक्कम घेतली जात नसेल…मात्र रुग्णालयाचे नाव वाढत गेले आणि गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेल्यामुळे अनामत रक्कम देण्यास सुरुवात झाली..कालच्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला..इथून पुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूममधून आलेला असतो पण डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलेला असो,लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्याच्याकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही.
असा ठराव विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी केला असून त्याची अंमलबजावणी आजपासून होईल.झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशी बाहेर येईलच परंतु या निमित्ताने या असवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत.






