आंतरराष्ट्रीय

लंडनहून मुंबईला निघालेले विमान उतरले तुर्कीत; ३० तास अडकलेल्या प्रवाशांना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा दिलासा

लंडनवरुन मुंबईत येणाऱ्या विमानाचे तुर्कीत लष्करी विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग

केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या संवेदनशीलतेने प्रवाशांना दिलासा

लंडनवरुन मुंबईला प्रवासी विमान घेऊन जाणारे व्हर्जिन अटलांटिक विमान (व्हीएस३५८) मध्ये एका प्रवाशाच्या वैद्यकीय आणीबाणीमुळे अचानक तुर्कीतील दियाबाकीर विमानतळावर इमर्जन्सी अवघडरित्या लँडिग करावी लागली. मात्र, दियाबाकीर विमानतळ हे लष्करी विमानतळ आकाराने छोटे असल्याने हार्ड लँडिंग होउन गियरमध्ये समस्या निर्माण झाली. तसेच या विमानतळावर  सुविधांची कमतरता व संर्पक साधनांच्या मर्यादा होत्या. त्याचप्रमाणे संबंधित विमानतळ हे इतर देशांतर्गत/ आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या तुलनेत लहान असल्याने त्याठिकाणी लहान व्यवसायिक विमानांचे आणि लष्करी विमानांचेच उड्डाण होते. त्यामुळे संबंधित ठिकाणी भारतीय प्रवासी ३० तास अडकून पडले होते.

त्यातील काही प्रवाशांच्या ओळखीच्या लोकांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संर्पक साधून मदतीची मागणी केली. मोहोळ यांनी संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळत अडकलेल्या प्रवाशांशी, संबंधित अधिकाऱ्यांशी हवाई खात्या मार्फत बाेलणे करत व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स यांच्याशी देखील चर्चा केली.

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262

त्यानंतर वेगवान हालचाली करत विविध यंत्रणाशी संर्पक करत प्रवाशांना दिलासा देत त्यांना मुंबईला परतण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून विमान उपलब्ध झाल्याने प्रवाशांना तातडीने मायदेशी येण्यासाठी दिलासा मिळाला आहे.

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी दियाबाकीर विमानतळावर अडकलेले प्रवासी, व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी हवाई मंत्रालय मधील एक विशेष पथक नियुक्त केले. तसेच चांगल्या समन्वयासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची तसेच तुर्की मधील भारतीय राजदूताची देखील मदत घेतली. त्यामुळे एकत्रित प्रयत्नातून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी महारष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय यांनी देखील माेहाेळ यांच्याशी चर्चा केली.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या विनंतीनुसार, प्रवाशांना सँडविच, फळे व अल्पाेपहार देण्यात आले, र्गभवती महिलांची विशेष काळजी घेतली, लहान मुलांना आवश्यक साधने उपल्बध केली, वैद्यकीय सेवा उपलब्ध केली. व्हर्जिन अटलांटिकने लँडिग गियरची समस्या साेडविण्याचा प्रयत्न केला परंतु साेडवण्यात अपयश आले. कारण, संबंधित एअरलाइन्सने लंडनहून तुर्कीच्या दिशेने नवीन प्रवासी वाहतूक विमान पाठवले परंतु तुर्की सरकार व लष्कराने सदर विमानास लॅँडिग परवानगी नाकारली. त्यामुळे सदर विमानाला पुन्हा मार्गस्थ व्हावे लागले. सध्या र्व्हिजन अटलांटिक संबंधित विमानातील लँडिंग गियरची समस्या साेडविण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय हवाई खात्याचे पाठपुराव्याने तुर्की सरकारच्या नियमांनुसार प्रवाशांना हाॅटेल मध्ये रहाण्याची साेय व नियमित प्रक्रियेसाठी तीन दिवसांचा ट्रान्झिट व्हिसा देण्यात आला. तसेच प्रवाशांना दुसऱ्या विमानतळावर नेऊन पर्यायी विमानाने घेऊन जाण्याकरिता प्रयत्न करण्याचा मार्ग देखील सूचित करण्यात आला. दरम्यान, माेहाेळ यांनी परिस्थितीवर देखरेख ठेवत अधिकारी व एअरलाइन्स यांच्या संर्पकात राहून नियमित घडामोडींची माहिती घेत राहिले आणि तांत्रिक मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहिले. सदर प्रवाशांचे तुर्कीवरुन मुंबईच्या दिशेने व्हर्जिन अटलांटिकच्या विशेष विमानाने उड्डाण झाले असून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता ते मुंबई विमानतळावर सुखरुप उतरणार आहे.

Img 20250310 wa02324095435649637866308

मुरलीधर मोहोळ यांची कार्यतत्परता

याबाबत मुंबईतील उच्च न्यायालयात कामकाज करणारे ॲड .सत्यम सुराणा यांनी सांगितले की, लंडनवरून मुंबईला येणाऱ्या संबंधित विमानात माझा एक मित्र प्रवास करत होता. त्यांनी अचानक तुर्कीत अडकून पडल्याची  मला माहिती दिल्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधत त्यांना माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मला तात्काळ निरोप आला, त्यांनी संपर्क साधत सविस्तर घटना जाणून घेतली .हवाई मंत्रालयातील दोन अधिकारी सातत्याने वेगवेगळे यंत्रणांशी संपर्क करण्यासाठी नेमण्यात आले. वेगवान हालचाली केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळू शकला आहे. या माध्यमातून केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची कार्यतत्परता दिसून आली आहे.

Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये