मिळकतीवरील ४०% कर सवलती करता PT3 अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची दिपाली धुमाळ यांची मागणी..

पुणे : मिळकतीवरील ४०% कर सवलती करता PT3 अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत देण्यात आलेली मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
धुमाळ यांनी या संदर्भातील निवेदन महापालिका आयुक्त व उपयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग यांना दिले आहे. अनेक मिळकत दारांना PT3 अर्ज भरणे बाकी असल्याने ही मुदत वाढवण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पुणे शहरातील ३ लाख मिळकतीची सवलत मागील वर्षी चुकीच्या सर्वेने काढून घेण्यात आली होती. महापालिकेने ही सवलत पुन्हा कायम करण्यात आली व ज्यादा
आलेली रक्कम काढून टाकण्यासाठी PT3 फॉर्म अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यन्त मुदत दिली गेली होती. सध्याची परिस्थिती अशी आहे की आतापर्यंत २ लाख नागरिकांनी या फॉर्मचे अर्ज केले आहेत. परंतु अजूनही १ लाख मिळकतदारांचे अर्ज भरायचे बाकी आहे. तरी या शिल्लक राहिलेल्या नागरिकांना PT3 फॉर्म अर्ज भरण्यासाठी दिलेल्या वेळेत मुदतवाढ करण्यात यावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.









