पुणे शहर
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पुणे : कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे आणि अन्य दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली आहे. 15 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
सचिन तामखेडे हे दोन वर्षांपुर्वी प्रतिनियुक्तीवर पुणे महापालिकेत रूजू झाले होते. राज्य सरकारकडून त्यांनी प्रतिनियुक्ती घेतली होती. यापुर्वी त्यांनी भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयात देखील कामकाज पाहिले.




