राजकीय

…तर दाऊदचं नाव घेतलं जातं : ईडीवर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचं हे उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे घडेल. कारण, नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात, त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल अधिक भाष्य करण्याची गरज नाही,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

“काही झालं तर आणि विशेषकरुन मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घेतलं जातं.राज्याचा मुख्यमंत्री असतानाही असा आरोप झाला होता. त्यावेळीही असंच वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. त्याला आता 25 वर्ष झाली. पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, लोकांना त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करण्याचं काम सुरु आहे. जे लोक केंद्र सरकारविरोधात तसंच विरोधात वापरल्या जाणाऱ्या तपास यंत्रणांविरोधात जे भूमिका मांडतात त्यांना हा त्रास देण्याचा प्रयत्न असून तेच घडलं आहे,” असंही शरद पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये