पुणे शहर

पुण्यात आठ लाखांचे मेफेड्रोन जप्त

पुणे : येरवडा येथील पर्णकुटी परिसरातून अमली पदार्थ विक्री प्रकरणी गुन्हे शाखेने एकाला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून मेफेड्रोन (एमडी) नावाचा अमली पदार्थ, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, मोबाइल संच असा सात लाख ८८ हजारांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Img 20220518 wa00135092505186750304354 2

समीर उर्फ आयबा शहाजहान शेख (रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि पथक येरवड्यातील पर्णकुटी भागात गस्त घालत होते. त्या वेळी पर्णकुटी टेकडीच्या पायथ्याजवळ शेख थांबला होता. त्याच्याकडे अमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा लावून त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून सात लाख ८१ हजारांचे ५२ ग्रॅम मेफेड्रोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, प्लास्टिक पिशवी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गायकवाड, मारुती पारधी, मनोज साळुंके, पांडुरंग पवार, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये