कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती मंदिराजवळ रिक्षावर झाड कोसळून चौघे जखमी

पुणे: कोथरुडमधील कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती मंदिराजवळ एका रिक्षावर झाड कोसळल्याने त्यात तिघे जण जखमी झाले. सुदैवाने रिक्षातील तिघांना किरकोळ जखमा झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढून ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. ही घटना सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी घडली.
याबाबत अग्निशामक दलाकडून दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड येथील दशभुजा मंदिराजवळील कॅनॉल रोडवरुन रिक्षा
जात होती. त्याचवेळी एक गुलमोहराचे झाड उन्मळून रिक्षावर पडले. त्याचवेळी तेथून एक दुचाकीही जात होती. दुचाकीचालक सुदैवाने वाचला. झाड रिक्षावर पडल्याने त्यातील प्रवासी आत अडकले होते.
अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन झाडाच्या फांद्या बाजूला करुन आतील प्रवाशांची सुटका केली. त्यांना किरकोळ जखमा झाल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.



















