आरोग्य

म्युकोरमायकोसिस आजाराने काळजी वाढली ; लवकर निदान व अचूक उपचार गरजेचे..

म्युकोरमायकोसिस झालेल्या व्यक्तीवर हर्डीकर हाॅस्पीटल मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया..

पुणे: pune city आज जागतिक पातळीवर आरोग्य व्यवस्थेवर कोरोना संसंर्ग  नियंत्रणाचा ताण असताना जगात विशेषतः भारतासारख्या देशात आज म्युकोरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशीच्या  आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. तसा म्युकोरमायकोसिस आजार हा एक फंगस, बुरशीचा आजार आहे. पुर्वीच्या काळी क्वचितच हा आजार बघायला मिळत असे परंतु आजमितीस कोरोना व्हायरस संसंर्ग काळात हा आजार बर्‍यापैकी प्रमाणात वाढताना दिसत आहे. Early diagnosis, correct treatment can cure Mucormycosis

कोरोना संसंर्ग रुग्णात शरारिक प्रतिकार शक्ती कमी होते. कोरोना संसर्गावर उपचार करताना बहुतांश रुग्णांना स्टीराॅइड्सचा वापर करावा लागतो. व ज्या रुग्णांना मधूमेह सारखा आजार आहे त्यांना हा काळी बुरशीचा आजार होण्याचा धोका जास्त आहे. कर्करोगा पेक्षा जास्त पटीत पसरणारा हा आजार आहे काळी बुरशी.

अचानक पणे दात हलण्यास सुरूवात होणे, दात दुखणे, डोळ्यावर सुज येणे, पाणी येणे, दातामधून पू येणे, नाकातून पू येणे, दृष्टी कमी होणे, नाकाजवळील गालावरच्या भागावर सूज येणे अशी बरीच लक्षणे ह्या काळी बुरशी आजाराची म्हणजेच म्युकोरमायकोसिसची आहेत.

Img 20210430 wa0001

एक महिन्यां पुर्वीच करोना संसंर्ग  होऊन बऱ्या झालेल्या महिला रुग्णाला ह्या काळ्या बुरशीची म्हणजेच म्युकोरमायकोसिस ची लागण झालेली. ती महिला  डेक्कन हर्डीकर हाॅस्पीटल येथे दाखल झाली. सर्व तपासण्या जसा की तोंडाचा सायन्सचा एक्सरे, स्कॅन, योग्य ती दाताची तपासणी करण्यात आली व रुग्णाला काळी बुरशीचा आजार असल्याचे स्पष्ट झाले.

ह्याच रूग्णालयात ह्या रुग्णावर अवघड व अतिशय  दुर्मिळ आजारावरची शस्त्रक्रिया करण्यात आली. डाॅ.लक्ष्मण माळकुंजे (एम.डी.एस ओरल सर्जन) व  शस्त्रक्रिया मदतनीस डाॅ.प्रतिक मैटी ह्यांनी ही शस्त्रक्रिया केली. तर डाॅ. शिरीश धारसकर हे जनरल फिजीशियन म्हणून ह्या रुग्णावर उपचार करत होते. डाॅ.सचिन नागापूरकर अस्थीरोग तज्ञ म्हणून काम पहात होते.

ह्या आजाराबाबत डाॅ.लक्ष्मण यांनी सांगितले की, लवकर निदान,अचूक उपचार केले तर हा आजार बरा होऊ शकतो. परंतु निदान व उपचार ह्या मध्ये जर विलंब झाला तर ह्या आजारामुळे रूग्णाला डोळा गमवावा लागू शकतो. हा संसंर्ग मेंदुत गेला तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे कोरोना संसंर्ग झालेले व होऊन गेलेले रुग्णांनी कोणताही त्रास झाल्यास तत्काळ उपचार सुरू करावेत. आज तरी ह्या काळी बुरशी ह्या आजारावर लवकर निदान व लवकर उपचार हेच महत्वाचे आहे….

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये