मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला नव्या वर्षात होणार! सुप्रीम कोर्टाकडून 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढ

शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत मुदत वाढवून देण्याच्या विधिमंडळाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाच्यावतीने वेळ वाढवून देण्यात आली आहे. अपात्रता सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 डिसेंबर पूर्वी निर्णय करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले होते. मात्र निकाल लेखनाला लागणारा वेळ लक्षात घेता वेळ वाढवून द्या, अशी मागणी अध्यक्षांनी केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने तीन आठवड्यांचा वेळ न देता 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याचे राहुल नार्वेकरांच्या वकिलांनी मान्य केले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणीचा निर्णय 10 जानेवारीपर्यंत येईल असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 31 जानेवारी पर्यंतच्या निर्णयावर कोणतेही भाष्य केलेले नाही. 10 जानेवारी किंवा 10 जानेवारीच्या आत शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय येणार आहे. शिवसेना संदर्भातील निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारी ही डेडलाईन दिली आहे.



विधानसभेत अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. अंतिम सुनावणी 18 ते 20 डिसेंबर या तीन दिवसांत पूर्ण होणार आहे. 21 ते 31 डिसेंबर कालावधीत निकालाचे लेखन अशक्य आहे. निकालाचे लेखन करण्यासाठी मात्र अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. एक हजारांहून अधिक प्रश्नांच्या उत्तराचे वाचन करण्याचे आवाहन विधीमंडळासमोर आहे. नागपूरवरून मुंबईत कागदपत्रे नेण्यासाठी ही वेळ लागणार आहे. परिणामी या पार्श्वभूमीवर निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागण्यात आला होता.






