पुणे शहर

महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप खर्डेकर यांची निवड

पुणे : महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या वतीने रोलबॉल मैदान, बाणेर येथे संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप खर्डेकर तर सचिवपदी प्रताप पगार यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी निरीक्षक म्हणून उत्तर प्रदेश रोलबॉलचे अध्यक्ष राकेश त्यागी यांनी कामकाज पाहिले. यावेळी रोलबॉल खेळाचे जनक माननीय श्री राजू दाभाडे, आशियाई रोलबॉल संघटनेचे सचिव आनंद यादव, भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव चेतन भांडवलकर यांच्यासह सर्व जिल्हा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ही कार्यकारिणी ४ वर्षासाठी कार्यरत असणार आहे.

Fb img 1647413711531

कार्यकारिणी पुढील प्रमाणे :
अध्यक्ष – संदीप खर्डेकर (पुणे )
उपाध्यक्ष – श्री संजय कोल्हे (यवतमाळ), हेमंत भगत (चंद्रपूर), राजू दाभाडे (पुणे)
सचिव- प्रताप पगार( ठाणे )
सहसचिव – अमितकुमार पाटील (कोल्हापूर), आनंद पटेकर (अहमदनगर), जयप्रकाश सिंग (मुंबई)
खजिनदार – प्रमोद काळे (पुणे)
सदस्य- पल्लवी शिंदे (सातारा), प्रवीण गडदे (उस्मानाबाद), नंदलाल पाटील (नंदुरबार), शैलेंद्र पाराशर (नागपूर)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये