पुणे शहर

गणेशोत्सवात ‘हे’ पाच दिवस दारू विक्रीला बंदी; जिल्हाधिकारी राजेश देशमुखांचा आदेश

पुणे : पुण्यात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 5 दिवस दारु विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात शांतता रहावी यासाठी हे आदेश काढण्यात आले आहे.

हे पाच दिवस असेल विक्री बंद
यंदा पुणेकर दोन वर्षांनी गणेशोत्सव साजरा करणार आहे. त्यासाठी शहरात जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. पुणे पोलीस देखील या गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे. या गणेशोत्सवाला गालबोट लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या, पाचव्या, सातव्या आणि विसर्जनाच्या मिरवणुक संपेपर्यंत असे पाच दिवस पुणे शहरात दारु विक्रीवर बंदी करण्यात आली आहे.

गणेशोत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज आहेत. त्यांनी यासाठी नियमावली देखील जाहीर केली आहे. पत्रकार परिषद घेत यासंदर्भातील माहिती दिली. शहरात 3,600 सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. या मंडळांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर देखील या गणपती मंडळांच्या गर्दीच्या ठिकाणी असणार आहे. शहरात 7,500 पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहे.

Img 20220804 wa0019951227047229036961
Img 20220801 wa0304
Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये