श्रीमानयोगी प्रतिष्ठानकडून गणेशमुर्ती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

500 बाळगोपाळांनी घेतले प्रशिक्षण
कोथरूड : महेश विद्यालयाच्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमानयोगी प्रतिष्ठान व महेश बालभवन यांच्या विद्यमाने कोथरूड परिसरातील बाळगोपाळांसाठी सुंदर सुबक गणेश मुर्ती घडविण्याचे मोफत प्रशिक्षण तज्ञ कारागिराकडुन आयोजित करण्यात आले या कार्यशाळेत जवळपास 500 बाळगोपाळांनी सहभागी होत सुंदर गणेश मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती ऐवजी शाडुच्या मातीच्या गणेश मुर्ती या पर्यावरणपुरक असतात, लहान वयातच बाळगोपाळांना शाडुच्या मुर्तीचे महत्व तसेच बनविण्याचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे त्यामुळे महेश बालभवन यांच्या सहकार्यातून आम्ही श्रीमानयोगी प्रतिष्ठानने गणेश मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण आयोजित केले होते अशी माहिती श्रीमानयोगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी दिली.







