कर्वेनगरमध्ये कबड्डीच्या रोमहर्षक लढती.. २६ संघांचा समावेश

महाराजा यशवंतराव होळकर चषक कबड्डी स्पर्धेत सुकाई क्रीडा मंडळ, खडपोली संघ विजेता
पुणे : karvenagar कर्वेनगरच्या सम्राट अशोक विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या महाराजा यशवंतराव होळकर चषक कबड्डी स्पर्धेत रोमहर्षक लढती क्रीडा प्रेमी प्रेक्षकांना अनुभवता आल्या. या स्पर्धेत सहभागी झालेल्या २६ संघांमध्ये चुरशीच्या लढती पार पडल्या. एकमेकांवर मात देण्यासाठी संघाने आखलेले डाव, वर खाली होत असलेले गुण आणि त्यामुळे निर्माण झालेली चुरस प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका वाढवत होती.
karvenagar कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराजा यशवंतराव होळकर चषक कबड्डी स्पर्धा 2024 मध्ये सुकाई क्रीडा मंडळ, खडपोली संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळवले. या स्पर्धेत सुकाई क्रीडा मंडळ हा संघ हा उपविजेता ठरला. तर तृतीय क्रमांक वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी यांना तर चतुर्थ क्रमांक मानाई क्रीडा मंडळ तळवडे, यांनी मिळवला. शिस्तबद्ध संघ म्हणून जय हनुमान क्रीडा मंडळ, उत्कृष्ट खेळाडू रमेश वरक, उत्कृष्ट चढाई गणेश बावधने, सर्वोत्कृष्ट पकड दीपक झोरे यांना मिळाला यांना पारितोषिके देण्यात आली.

या कबड्डी स्पर्धेमध्ये 26 संघ सहभागी झाले होते, सम्राट अशोक विद्यालय कर्वेनगर पुणे च्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत अनेक मान्यवरांनी हजेरी लावली यावेळी हभप भगवान महाराज कोकरे, चिपळूण तालुक्याचे आमदार शेखर निकम, माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, जयंत भावे, सायली वांजळे, तसेच संगीता बराटे, विजय खळदकर, संतोष बराटे, स्वप्निल दुधाने, सचिन दांगट, रुपेश कदम, विष्णुपंत सलगर, राहुल ढेबे, कवयत्री निशा शिंदे, उद्योजक तुकाराम काळे, रोहिदासजी गोरे, प्रकाश घंटी, विठ्ठल कडू, रवींद्र ननावरे तसेच तालुका क्रीडा अधिकारी संदीप वांजळे, महावितरणचे कोथरूड विभागाचे कार्यकारी अभियंता विजय फुंदे इत्यादीउपस्थित होते.
महाराजा यशवंतराव होळकर चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन चिपळूण तालुका धनगर समाज पुणे यांच्या वतीने अध्यक्ष संतोष वरक, भगवान शिंदे, विकास माने, मंगेश कोकरे, रूपाजी गोरे, पांडुरंग खरात, विलास खरात, सुनील कोकरे, पांडुरंग शेळके, राजाराम गोरे, दीपक झोरे, संदीप शेळके, सुनील खरात, आनंद वरक, बाबू खरात, रामचंद्र शेळके, पांडुरंग खरात, काशिनाथ गोरे, बारकू खरात, सुशांत भिसे, अशोक कदम, सागर फाटक, इत्यादी कार्यकर्त्यांनी केले होते. या कबड्डी स्पर्धेला सामाजिक, राजकीय, क्रीडा तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिली.


