सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्ट शेगाव शाखेच्या वतीने दुग्धपान वाटपाचा कार्यक्रम शेगाव येथे संपन्न

शेगाव : नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक संस्थांमार्फत विविध नाविन्यपूर्ण समाज उपयोगी उपक्रम केले जात असतात असाच एक उपक्रम महाराष्ट्रातील सर्वात्मक महारुद्र परिवारा ट्रस्ट यांच्या शेगाव शाखेच्यावतीने भक्तगण नागरिकांसाठी दुग्धपान वाटप सेवे अंतर्गत भाविकांना दूध वाटप करून करण्यात आले.
मठाधिपती गुरुवर्य श्री प्रकाश भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. हजारो भक्तगण आणि नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आणि कौतुक देखील केले. या उपक्रमासाठी शेगाव शाखेचे राघव चिमणकर श्री भरत मिसाळ अभिषेक मानकर अभिषेक तायडे यांच्यासह सर्व सहकारी यांनी आयोजनची धुरा सांभाळली.
पुढील काळात अशाच अनेक समाज उपयोगी उपक्रमांमार्फत जनसामान्यांचे सेवा सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्टमार्फत सुरू राहील असे मत शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.



