पुणे शहर

दत्तजयंतीनिमित्त नारायणपूर, गोंदवलेसाठी जादा एसटी बसेस

पुणे : एसटीच्या पुणे विभागाकडून दत्त जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या सोमवारी (दि.06) आणि मंगळवार (दि.07) रोजी दत्त जयंती सोहळ्या निमित्त नारायणपुर, गोंदावले येथे जाणार्‍या प्रवाशांकरिता उपलब्ध असतील.

या जादा गाडया एसटीच्या पुणे विभागातील शिवाजीनगर, स्वारगेट, बारामती, भोर, शिरुर, नारायणगांव, राजगुरुनगर, तळेगाव, इंदापुर, सासवड, दौंड, पिंपरी-चिंचवड बस स्थानकांवरून सोडण्यात येतील. तसेच नारायणपुर येथे जाण्यासाठी हडपसर व कापूरहोळ येथून आवश्यकतेनुसार जादा गाडया सोडण्याचे देखील नियोजन करण्यात येणार आहे. तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभागाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.

Img 20221126 wa0212847205965836399706

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये