पुणे शहर

कोथरुडमध्ये युवकावर शस्त्राने वार; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पुणे : किरकोळ वादातून युवकावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कोथरूडमध्ये घडली आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यश कालीदास जगताप (वय १८, रा. साईनाथ वसाहत, कोथरुड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सचिन शंकर कदम (वय २३), प्रवीण शंकर कदम (वय २९, दोघे रा. साईनाथ वसाहत, कोथरुड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सचिन आणि प्रवीण हे यशच्या ओळखीचे आहेत. रात्री अकराच्या सुमारास यश मित्रांबरोबर साईनाथ वसाहतीत गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपींनी यशला शिवीगाळ करुन त्याच्यावर कोयत्याने वार केले. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक फडतरे तपास करत आहेत.

Img 20221126 wa0212847205965836399706

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये