पुणे शहर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा; असे आहे वेळापत्रक

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा मानला जात आहे.  पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि फुगेवाडी ते पिंपरी या दोन टप्प्यांचे होणार उद्घाटन होणार आहे. यासह अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुणे मेट्रोच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुण्यात येणार आहेत.या दौऱ्यात मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे होणार उद्घाटन होणार आहे. यासह अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते पारपडणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महामेट्रोच्या उदघाटनासाठी पुण्यात येणार आहेत.
6 मार्च रोजी सकाळी 10:30मिनीटांनी लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा पारपडणार आहे.
 
पंतप्रधान मेट्रोच्या उद्घाटनासाठी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशनवर जातील. तेथून मेट्रोने ते आनंदनगर स्टेशन येथे जाणार आहेत.
 
मेट्रोचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची जंगी सभा होणार,

 एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावरील सभा आटोपल्यानंतर हेलिकॉप्टरने ते लवळे येथील कार्यक्रमाला जाणार आहेत.लवळे येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45
Img 20220225 wa00038702747946855041624

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये