शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या तुषार भोसलेंवर गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी युवकची अटकेची मागणी

गुन्हा दाखल करण्यासाठी कोथरूड पोलिसांना राष्ट्रवादीचे निवेदन
पुणे : भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आक्षपार्ह भाषेत शरद पवार यांच्यावर टीका केली. यावरुन राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी तुषार भोसलेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांना निवेदना द्वारे करण्यात आली आहे . शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आचार्य तुषार भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करावा व यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
क्रुझ पार्टीवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अट केली होती. क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासह इतर अनेक जणांना २ ऑक्टोबर अटक करण्यात आले. त्यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर भोसले यांनी टीका केली आहे.
व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षांचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल?, वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है, असं म्हणत तुषार भोसले यांनी टीका केली होती. या टीकेवरुन राष्ट्रवादीने कारवाईची मागणी केली आहे.




