महाराष्ट्र

डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

मुंबई/पुणे : विधान परिषदेच्या उपसभापती, ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार आहेत. शिंदे गटातील त्यांचा पक्षप्रवेश मुंबईत शुक्रवारी सायंकाळी होण्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या बरोबर विधान परिषदेचे एक आमदारही प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला धक्का बसणार आहे.

डॉ. गोऱ्हे ठाकरे गटाच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात. ठाकरे गटातील प्रमुख महिला नेत्या म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. भाजप बरोबरची शिवसेनेची युती तुटल्यानंतर ठाकरे यांची बाजू त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाच्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Img 20230707 wa00028448431949763512232
Img 20221228 wa00016208176808646242256
Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये