सहकारी गृहरचना संस्थांसाठी भा. ज. पा. लीगल सेलच्यावतीने मोफत कायदा सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

पुणे : लोकनेता ते राष्ट्रनेता सेवा पंधरवडा निमित्त भा.ज.प लीगल सेल, पुणे शहर यांच्यावतीने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी मोफत कायदा सल्ला व मार्गदर्शन केंद्र, ए ११, मंगलम चेंबर्स, अभ्युदय सहकारी बँकेंच्यावर दुसरा मजला, आयडीयल कॉलनी मेट्रो स्टेशन जवळ, पौड रोड, कोथरूड येथे सुरू करण्यात आले.
या सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन माजी नगरसेविका छायाताई मारणे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी पणन संचालक व अप्पर निबंधक सहकारी संस्था, डॉ. किशोर तोष्णिवाल, भा. ज. प. लीगल सेल पुणे शहर अध्यक्षा ईशानी जोशी, अजय मारणे उपस्थित होते.

यावेळी बोलताना छाया मारणे यांनी गृहनिर्माण संस्थांसाठी हा
उपक्रम अतिशय उपयुक्त व गरजेचा असल्याचे मत व्यक्त केले आणि डॉ. किशोर तोष्णिवाल यांनी ‘सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे.’ असे मत व्यक्त केले.
दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सायंकाळी ४ ते ७ या वेळात सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ विधिज्ञ व निवृत्त अधिकारी यांच्यामार्फत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शन केंद्राचा जास्तीत जास्त सहकारी गृहनिर्माण संस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन ईशानी जोशी यांनी केले.



या कार्याक्रमास ॲड मोहना गद्रे, ॲड सचिन राणे,ॲड परेश धारणे, ॲड शुभम सोनी आदि उपस्थित होते. भा. ज. प. कोथरूड विधानसभा मतदारसंघ वकील आघाडीचे अध्यक्ष ॲड नवनाथ लाड यांनी आभार मानले. मोफत कायदा सल्ला केंद्राचे संचालक व भा. ज. प. लीगल आघाडी, पुणे महानगर सचिव नरेंद्र लडकत यांनी सूत्रसंचालन केले.



